काळाच्या ओघात वैदिक धर्माच्या मूळ परंपरेला छेद देत स्वार्थ साधण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता यांनी कधी एकत्र येत, कधी एकमेकांच्या विरोधात जात तर कधी परस्परांवर कुरघोडी करत परिवर्तन साधलं. ते कधी समाजहिताचं तर कधी समाजविरोधी ठरलं. मूळ प्राचीन साहित्य काळाच्या ओघात कथा, दंतकथा सामावून घेत समृध्द तर कधी दूषित झालं.
कालचक्र आणि परिवर्तन एकमेकांना पूरक असतात. कालचक्राच्या प्रत्येक पैलूवर परिवर्तनाचा प्रभाव असतो. द्रष्ट्या ऋषिमुनींनी कालचक्राच्या पलीकड