आजच्या जगात परवलीचे शब्द ठरलेल्या व्यवस्थापन, प्रशासन, जागतिकीकरण, आर्थिक धोरणं यांमधील अनेक मूलतत्वांची प्राचीन, पौराणिक, ऐतिहासिक घटनांशी व दंतकथांशी सुयोग्य सांगड घालता येते. व्यवस्थापनाची बहुतांश सगळीच तत्त्वं पुरातनकाळात भारतात वापरली जात होती.
प्रभू रामचंद्र रावण वधानंतर अयोध्येत परतले तेव्हा राज्याची घडी व्यवस्थित बसवण्यास त्यांनी न्यायदेवतेस अदृश्य रूपात वजनकाट्यावर बसवून व्यापारीवर्गास तराजूत योग्य ते द्रव्य करापोटी भरायला सांगितलं आणि त्