Share this book with your friends

Aaradhya Ghost Stories / आराध्य घोस्ट स्टोरीज (English, Hindi & Marathi)

Author Name: Editor : Nitesh Thokal | Format: Paperback | Genre : Young Adult Fiction | Other Details

आराध्य घोस्ट स्टोरीज हा त्रैभाषिक विशेषांक असून हा २५००० हुन अधिक शब्द संख्या असलेला भयकथा संग्रह आहे. त्यात पहिली कथा इंग्रजी मध्ये आहे. WHO IS THERE?! - Author : Sally Sason ह्यांनी त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शब्दांतून वाचकाला नक्कीच खिळवून ठेवेल ह्यात तिळमात्र शंका नाही. कथा वाचून झाल्यावर देखील मनात बराच वेळ तेच प्रसंग डोळ्यासमोर रेंगाळत राहतात हा अनुभव आम्हाला आला तू तुम्ही वाचकांनी देखील नक्की घ्या. 

कथा: खूनी चण्डालन - लेखक : देवेन्द्र प्रसाद [हिंदी कथा] ह्या हिंदी कथेत लेखकाने अत्यंत जागृत आणि भयानक प्रसंग हुबेहूब जिवंत केले आहेत. ह्या कथेतील गूढ आणि रहस्यमय रचना, मांडणी यातून कथा प्रत्यक्ष समोर घडतेय याचा प्रत्येय येतो.

 झोपाळा - लेखिका: तेजल भोईटे [मराठी कथा] हि एक थरारक कथा असून कथा वाचून अंगावर काटा येतो. अप्रतिम कल्पनाशक्ती आणि उत्कंठा वाढवणारी भयकथा आहे.

अमावस्या - लेखिका: चैत्राली सुमेश चिनकटे [मराठी कथा] हि कथा उत्तम मांडणी आणि उत्कृष्ट कथानक यासाठी नक्कीच वाचकांना खिवळून ठेवेल.ह्या कथेत प्रसंग फारच थरारक आणि कुठेही न थांबता अगदी शेवटपर्यंत वाचकाला घाबरवून सोडते.

फरसाण - लेखक : नितेश ठोकळ [मराठी कथा] ह्या कथेत एकूण कथेचे ८ भाग आहेत. त्यातील ६ भाग आराध्य साहित्य संग्रह ऍप मध्ये पूर्वप्रकाशित केले आहेत. पण भाग ७ आणि ८ हे केवळ ह्या विशेषांकातच प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच कथा एक हिवाळी रात्र - लेखक : नितेश ठोकळ [मराठी कथा] हि देखील तितकीच भयानक आणि रोमांचकारक आहे जितकी बाकीच्या कथा आहेत. खिडकी - लेखक: नितेश ठोकळ [मराठी कथा] ह्या कथेत खिडकी प्रकरण काय आहे ते जरूर वाचा.

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

(इंग्लिश, हिंदी अँड मराठी)

मी लेखक नितेश ठोकळ, ह्या आराध्य घोस्ट स्टोरीज विशेषांक जानेवारी २०२१ चा संपादक. आराध्य घोस्ट स्टोरीज विशेषांक आपल्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. कारण हा ह्या वर्षाचा पहिला भयकथा अंक आहे. ह्या अंकात एकूण ७ कथा असून ह्यात हिंदी, मराठी, इंग्लिश कथांचा समावेश असल्याने हा "त्रिभाषिक अंक" आहे. 

या अंकात शब्द मर्यादा असल्याकारणाने काही मोजके आणि ठराविकच कथा आम्ही येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकात सर्व कथा भयकथा असून विशेष म्हणजे सर्व वयोगटातील वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. या कथां मध्ये कुठलेच अपशब्द, किळसवाणे प्रसंग, अश्लील भाषा नसून दर्जेदार अस्सल भारतीय संस्कारांना जपून आणि संस्कृतीला गृहीत धरूनच लिहिल्या आहेत. ह्या सर्व कथा लेखकाच्या कल्पना आहे असून कुठलेच प्रसंग वास्तव नाही आहे. केवळ लेखकांनी या कथा खऱ्या, वास्तववादी, जिवंत आणि भयानक बनण्यासाठी त्या सत्यकथा असल्याचा केवळ आव आणला आहे. अश्याने कथा वाचण्यात वाचकाला खिळवून ठेवून त्याची उत्सुकता वाढावी हाच यामागे एकमात्र हेतू आहे. ह्या विशेषांकात आपल्याला एका पेक्षा एक दर्जेदार भयकथा कथा, हास्य भयकथा, थरारक कथा आणि गूढ रहस्य कथा ह्या अंकाचे विशेष आहे. आराध्य घोस्ट स्टोरीज विशेषांक हे एकप्रकारचे पुस्तक, कादंबरीच आहे. पण केवळ ते दरवर्षी जानेवारीत नियतकालिकेच्या स्वरुपात प्रकाशित होऊन उपलब्ध होत असल्याने ह्याला 'विशेषांक' असे संबोधले आहे.

Read More...

Achievements

+2 more
View All