Share this book with your friends

Bhintinpalyadache Ghar / भिंतींपल्याडचं घर

Author Name: Milind Toro | Format: Hardcover | Genre : Literature & Fiction | Other Details

हा एका वंशाचा इतिहास असला तरी तो प्रत्येकाला आपल्याच वंशाचा इतिहास वाटेल. तपशिलात थोडाफार फरक असू शकतो. स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते सुमारे १९८५ पर्यंतच्या कालावधीतल्या काही पिढ्यांची ही कहाणी आहे. प्रत्येक दशकातली कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती जशी बदलेल, तसा समाज, आणि कौटुंबिक व्यवस्था कशी बदलत गेली, यावरचे हे लेखन आहे. चार पिढ्यांचा हा इतिहास आहे. 

नियतीनं आपल्याशी युद्ध पुकारल्या नंतर पाळलेल्या संयमाची आणि सोशिकपणाची ही कथा आहे. प्रकाशातून अंधाराकडे झालेल्या आणि अंधारातून प्रकाशाकडे केलेल्या वाटचालीचे हे वर्णन आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही टिकवून ठेवलेली नाती आणि मानवी स्वभावांची वैशिष्ट्ये हे वाचणे आनंददायी ठरेल. 

तत्व, जात, समाज, तुटपुंजी वैद्यकीय सुविधा, शिक्षणाची आबाळ, यांमुळे अनेक कुटुंबाना अनेक आघात आणि वेदना सहन कराव्या लागल्या. अशा प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून त्यातून बाहेर पडलेल्या कुटुंबाचा हा इतिहास आहे. 

 

Read More...
Hardcover
Hardcover 655

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

मिलिंद तोरो

मिलिंद तोरो हे कोल्हापूरचे असून, त्यांचे शालेय शिक्षण वारणानगर येथे झाले. त्यांचे वडील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक, तर आई विद्यालयात संस्कृतच्या अध्यापिका होत्या. त्यामुळे साहित्याचे त्यांना बाळकडूच मिळाले होते. मेकॅनिकल इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इकॉनॉमिक्स मधे एम.ए. केले. १८ वर्षे इंजिनियरिंग क्षेत्रात काम केल्यावर गेली २४ वर्षे ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आय.आय.टी. सारख्या उच्च संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी ते फिजिक्स व मॅथेमॅटिक्स या विषयांचे मार्गदर्शन करतात. त्यांनी अनेक एकांकिका व आकाशवाणी साठी नभोनाट्ये लिहिली आहेत. अनेक एकांकिकांचे दिग्दर्शनही केले आहे. क्रीडा, निसर्ग, अध्यापन, वाचन, लेखन, प्रवास याची त्यांना आवड आहे.

 

Read More...

Achievements