Share this book with your friends

Dhund Hote Shabda Sare / धुंद होते शब्द सारे

Author Name: Pratilikhit | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

मराठी भाषा हिला मायमराठी का म्हणतात हे मराठी साहित्य वाचल्यावर कळालं. आई जशी आपल्या पिलांचा हात सोडत नाही तशी ही मायमराठी कधी काही कमी पडू देत नाही. पुस्तकं आणि कविता वाचून मराठीच्या प्रेमात पडलो, आणि त्याच प्रेमातून कविता लिहायला लागलो. कविता लिहिता लिहिता एक मैत्रीण म्हणाली, कविता तर चांगल्या लिहितोस तू स्टोरीस का नाही लिहीत .? थोडा विचार केला आणि त्याच रात्री प्रणयची गोष्ट लिहायला घेतली. तिथून या सगळ्याची सुरुवात झाली ती तेरा गोष्टीपर्यंत येऊन पोहोचली.  त्यातल्या सहा कथा या पुस्तकात आहेत. 

       प्रेम आणि त्याची वेगवेगळी रूपं. त्यातून जगात कित्तेक प्रसंग घडत असतील. याची फक्त कल्पना करून काही तरी लिहिण्याचा प्रयत्न केला. यातुन या तेरा लघु आणि दीर्घ कथा लिहून पूर्ण झाल्या. प्रत्येक कथा ही वेगवेगळ्या पार्श्वूमीवर आधारित आहे. प्रेम त्याच्या वेगवेगळ्या भावना या सगळ्या गोष्टी एकत्रित करून लिहिण्याचा प्रयत्न केला. कधी वकील नसताना, वकील झालो कधी, लेखक बनून कल्पना विस्तार केला. या कथा काल्पनिक असल्या तरी या लिहिताना खऱ्या अर्थाने मी त्या कथा जगलो. प्रणयची गोष्ट लिहायला घेतली आणि कविता कशी आधी मनात येते आणि कागदावर उतरते, तशी ही कथा मनात घर करून गेली.या कथा लिहिताना खर तर या कथा कधी जगलो माझं मलाच कळलं नाही. लिहिलेल्या कथा या काल्पनिक पण असं वाटतं होत की खरंच या गोष्टी समोर घडत आहेत आणि मी त्या पाहतोय आणि लिहितोय. अशीच कथा प्रेम, वाहिदा यांची सुद्धा होती. या काल्पनिक कथा लिहायला त्या खऱ्या आयुष्यात घडाव्याच असे काही नाही. 

      प्रेमाच्या वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या कथानकाच्या माध्यमातून मांडणे हा एवढाच काय तो उद्देश. या कथा वाचकांना नक्की आवडतील एवढीच अपेक्षा.

Read More...
Paperback
Paperback 205

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

प्रतिलिखित

मी प्रतिक देवताळे, मी प्रतिलिखित नावाने कविता तसेच कथा लेखन करतो. मी एक कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदवी प्राप्त विदयार्थी असून, त्या सोबतच छंद म्हणून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी काम करतो. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला माझ्या गावात, गणेशवाडी मध्ये महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक ग्रंथालय गेले एकशे दहा वर्षांहून अधिक काळ मराठीची सेवा करत आहे. लोक सेवा संघ नावाने चालणारे हे वाचनालय कित्तेक वर्ष जुन्या पुस्तकांनी मराठी आणि मराठी साहित्याची सेवा करत अविरत उभे आहे. 

          कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं गाव असणाऱ्या गणेशवाडी गावामध्ये लोक सेवा संघ वाचनालयामुळे वाचनाची गोडी निर्माण झाली. यानंतर थोडं फार लिखाण करायला घेतलं. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना कॉलेज तर्फे कवी संमेलन तसेच विविध चर्चा सत्रामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. 

         कॉलेज मध्ये असताना सकाळ वृत्तपत्रामध्ये कॉलेज कट्टा नावाचा उपक्रम राबविला त्यामध्ये विद्यार्थी स्वतः वार्तांकन करून ते दर सोमवारी प्रकाशित व्हायचे. या उपक्रमात कॉलेज कडून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तसेच एखाद्याची विचार करण्याची क्षमता चांगली असली की आपण चांगले लिहू शकतो. यासाठी योगाभ्यास देखील महत्त्वाचा आहे. मी या बरोबरच योग आणि ध्यान यांचा प्रशिक्षक असून, स्वतः गेली सात वर्षे योगाभ्यास करत असून ,लोकांना सुद्धा प्रशिक्षण देत आहे. 

         जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मराठी साहित्य आणि संस्कृती यांचा प्रचार आणि प्रसार यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

Read More...

Achievements