Share this book with your friends

Shivkalatil Prerak Ghatana / शिवकाळातील प्रेरक घटना

Author Name: Siddharth Navin Soshte | Format: Paperback | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

 जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडली आहे. शिवकाळाचे लिखित साधन म्हणजे शिवचरित्र व या चरित्रापासून प्रेरणा घेऊन कितीतरी महान लोक घडले व देशास घडवले. शिवकाळाचा अभ्यास करावयाचा म्हटला तर एक जन्मही पुरणे अशक्य आहे कारण याकाळाचे महत्व अथांग आहे आणि यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी नवे शिकवतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर भारतीय व विदेशी लेखकांनी विपुल लिखाण करण्याचा प्रयत्न केला तरीही आजही शिवकाळावर नव्याने लिखाण होतंच असते. या पुस्तकात शिवकाळातील परिचित व अपरिचित अशा प्रेरक प्रसंगाचा वेध घेण्यात आला आहे जे इतिहास अभ्यासकांना पूर्णपणे अपरिचित नसले तरी इतिहासाची आवड असणाऱ्या वाचकांच्या वाचनात फारसे येत नाहीत. या पुस्तकातील कथा वाचून वाचकांस ज्ञान व प्रेरणा मिळावी हाच उद्देश असून शिवचरित्राची ओढ असलेल्या वाचकांस हा प्रयत्न नक्की आवडेल अशी खात्री आहे.

Read More...
Paperback
Paperback 160

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सिद्धार्थ नवीन सोष्टे

सिद्धार्थ सोष्टे हे मराठी भाषेतील एक लेखक असून त्यांची इतिहास, पर्यटन व माहितीपर या विषयांवर एकूण सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Read More...

Achievements