पुस्तकाबद्दल दोन शब्द
इसापनितीच्या गोष्टी वाचून आणि परिवेषातल्या स्वानुभवातून बालपणी लिहिलेल्या बालपणातल्या गोष्टी म्हणजे हा बालकथासंग्रह. ‘जिथे नाही एकता’ ह्या अहिराणी बालकथा संग्रहात एकूण दहा गोष्टी आहेत. लहानपणापासून लोककथा ऐकत- सांगत आलो. पाचवीपासूनच अवांतर वाचन.
वाईट अनुभवांतून खूप शिकायला मिळालं. या जगण्याच्या उर्मीतूनच लिहायला लागलो. अहिराणी आणि मराठीतही अशा दोन्ही भाषांमध्ये मी कथा, कविता लिहायला लागलो होतो. मराठीतल्या कथा, कविता प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या. पण अहिराणीतल्या कथा, कविता, अहिराणी ‘ढोल’ नियतकालिक प्रसिध्द होईपर्यंत तशाच पडून होत्या.
अहिराणीत लिहलेल्या खूप गोष्टी अजूनही वह्यांमध्ये तशाच पडून आहेत. इथं ज्या दहा गोष्टी निवडून घेतल्या, त्या निवडण्यावेळी वय वर्ष तीन ते पंधरा अशा वयाची मुलं डोळ्यासमोर ठेवली आहेत. याचा अर्थ मोठ्या माणसांनी या गोष्टी वाचूच नयेत, असं नाही. मोठ्या माणसांनी तर या गोष्टी आणखी मुद्दाम वाचायला हव्यात...
- डॉ. सुधीर राजाराम देवरे
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners