Join India's Largest Community of Writers & Readers

Share this product with friends

Garbhavastha / गर्भावस्था Ek Sampoorna Margadarshika

Author Name: MANOJ PAPRIKAR | Format: Paperback | Genre : Health & Fitness | Other Details

गर्भावस्था ही एक नैसर्गिक व आनंददायी प्रक्रिया आहे. स्त्रीला निसर्गाने दिलेली मातृत्वाची ती एक अनमोल देणगी आहे. त्यामुळे गर्भधारणा झाल्याचे कळल्यावर जबाबदारीच्या जाणीवेने घाबरून जाण्याचे किंवा संकोचून जाण्याचे कारण नाही. उलट, या येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी कशी करायची किंवा, हे होणारे बाळ सुदृढ, आरोग्यदायी होण्यासाठी गर्भवती मातेनी कशा तऱ्हेने काळजी घ्यायची याचा विचार करायला हवा.

स्त्रीची गर्भावस्था, त्यावेळी होणारे शारीरिक बदल, बाळाची गर्भातील टप्प्याटप्प्याने होणारी वाढ,  त्या त्यावेळेस घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम, धोक्याच्या सूचना या सर्वांबद्दल माहिती मिळेल व योग्य ते मार्गदर्शन होईल. हे पुस्तक वाचल्यावर दाम्पत्याचा हा गर्भावस्थेतील प्रवास सोपा, सुरक्षित व आनंददायी होण्यास नक्कीच मदत होईल.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

मनोज पापरीकर

डॉ. मनोज  पापरीकर हे स्त्रीरोग तज्ञ असुन गेली तेरा वर्ष ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक रुग्णांचा अनुभव गाठीशी असल्याने, निष्णात स्त्रीरोग तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. लापरोस्कोपिक शस्त्रक्रिये मधे त्यांचे  प्राविण्य आहे.

वैद्यकीय व्यवसाया बरोबरच ट्रेकिंग व फोटाग्राफी ची त्यंना अतिशय आवड आहे. ते नाशिकला स्थायिक आहेत.

डॉ. मोनिका पापरीकर ह्या आयुर्वेद तज्ञ असुन गेली तेरा वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. मानसशास्त्र पद्युत्तर असल्याने रुग्णांची मानसिकता नीट समजुन औषधोपचार करणे ही त्यांची विशेषता आहे. ‘मोहक हर्बल्स’ या नावाने आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधने यांचे उत्पादन त्या करतात. सामाजिक बांधिलकी जपत गरजु रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य गेली अनेक वर्ष त्या करत आहेत.

 

Read More...