Share this book with your friends

Kutumb Shakti / कुटुंब शक्ती

Author Name: Chetan Joshi | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

आनंदी आणि सुखसमृद्धीचे जीवन जगणे हा प्रत्येक मानवाचा मुलभूत अधिकार आहे. श्रीमंत होणे, नावलौकिक मिळविणे आणि सुखी व संपन्न जीवन जगणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. पैसा कमविणे आणि नाव कमावणे ह्या मध्ये सर्वसामन्य माणूस गुरफटल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे श्रीमंत होऊनही अनेक व्यक्ती सुखी व समाधानी होऊ शकत नाहीत.

समृद्धी आणि मानसिक शांतीचे जीवन जगण्याचा मार्ग हा कुटुंबातूनच जातो हे सार पुस्तकातून मांडण्यात आले आहे. साध्या आणि सरळ सूत्रांच्या माध्यमातून संपन्नतेचे जीवन कसे जगायचे हे सोप्या शब्दात ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

चेतन जोशी

चेतन जोशी यांनी भूशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. सुरुवातीचे पाच वर्षे खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गेल्या २६ वर्षापासून स्वतंत्र व्यवसाय करीत आहेत. साधारणतः १५ वर्षापासून विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देत आहेत. विविध सामाजिक, धार्मिक संस्थांशी निगडीत आहेत. २०१४ पासून कुटुंब प्रबोधन ह्या विषयाशी संबंधित ‘सुसंवाद’ नावाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुखी व संपन्नतेचा मार्ग हा कुटुंबापासूनच जातो ह्याचे मार्गदर्शन सातत्याने करीत आहेत. एधस लाईफ एज्युकेशन प्रा. लि. या संस्थेच्या माध्यमातून कुटुंब विषयक विविध प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून आयोजित करण्यात येत आहेत.

Read More...

Achievements

+9 more
View All