Share this book with your friends

Mumbaicha Adnyat Itihas - Puri Te Mumbapuri / मुंबईचा अज्ञात इतिहास - पुरी ते मुंबापुरी मुंबईच्या प्राचीन इतिहासाचा हरवलेला अध्याय

Author Name: Siddharth Navin Soshte | Format: Paperback | Genre : History & Politics | Other Details

मुंबई! भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक बंदरवजा महानगर. मुंबईचा महिमा काय वर्णावा? भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर, महाराष्ट्र राज्याची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, जगातील पाचव्या क्रमांकाचे महानगर, भारत आणि दक्षिण-पश्चिम-मध्य आशियातील सर्वाधिक वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर, भारताच्या सागरी मालवाहतुकीत ५०% योगदान असलेले एक बंदर आणि भारतीय उद्योगांचे माहेरघर अशी अनेक बिरुदे या शहरास प्राप्त आहेत.

मुंबईचा अज्ञात इतिहास हे पुस्तक पूर्णपणे मुंबईच्या प्राचीन इतिहासावर आधारित असून या माध्यमातून मुंबई हीच प्राचीन कोकणची राजधानी पुरी होती हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे मुंबईच्या प्राचीन इतिहासावरील संशोधनास काही प्रमाणात दिशा मिळेल व भविष्यात अनेक नवे पुरावे हाती लागतील व मुंबई हीच प्राचीन पुरी होती हे सिद्ध होईल अशी आशा आहे. मुंबईचा प्राचीन इतिहास  जगासमोर यावा व तिच्या भरभराटीत योगदान देणाऱ्यांची महती सर्वांस समजावी या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिण्यात आले असून मुंबईवर व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.

Read More...
Paperback
Paperback 160

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सिद्धार्थ नवीन सोष्टे

सिद्धार्थ सोष्टे हे एक मराठी इतिहास अभ्यासक व लेखक असून त्यांची स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट, नागस्थान ते नागोठणे, मुंबईचा अज्ञात इतिहास, इतिहास भवानी तलवारीचा व रुळलेल्या वाटा सोडून ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Read More...

Achievements