Share this book with your friends

Pasaydan / पसायदान भाव-चिंतन

Author Name: Mrs Anjali Khishti | Format: Paperback | Genre : Letters & Essays | Other Details

ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान म्हणजे त्यांनी गुरूंपुढे मागितलेले पसाभर दान! मात्र या पस्यामध्ये विश्वाचे कल्याण व्हावे ही शुभेच्छा सामावलेली आहे. पसायदान हा चिंतनाचा विषय आहे. पसायदानाचे डोळसपणे चिंतन केले की त्यातील माऊलींच्या शुद्ध भावाशी आपणही समरस होतो. स्व-अवलोकन घडते. एवढेच नाही तर या शुभेच्छा दालनात आपला सहज प्रवेश होतो!

स्वामी समर्थांशी भक्त या भूमिकेतून आत्मनिवेदनरुपी घडलेल्या लेखिकेच्या संवादात माऊलींच्या पसायदानाचे विस्तीर्ण आकाश आपल्याला गवसत जाते व या चिंतनाकाशात आपणही शुभेच्छारुपी पंख पसरवून विहार करू लागतो......!

Read More...
Paperback
Paperback 210

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सौ. अंजली खिस्ती

सौ. अंजली माधव खिस्ती

• M.sc(Textile &clothing)अमरावती युनिव्हर्सि टी.

• संगीत विशारद,गायकी अंगाचे शात्रीय शिक्षण घेतले आहे.

• उर्दू गझल व सुफी साहित्य व गायनाचा अभ्यास.

• संत साहित्य व आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन.

• नामगायन, भक्तीरसधारा,हे भक्तीसंगीताचे तर गुलदस्ता हा गझल व

सुगम संगीताचा असे अनेक कार्यक्रम सादर.

• “पसायदान भाव-चिं तन” हे पुस्तक प्रकाशित, या पुस्तकाची दुसरी

आवृत्ती यूट्यूबवर प्रकाशित, तर तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.

• “ सहज स्वरूपानुभव” हे ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायावरील पुस्तक.

• ईराणचे जगप्रसिद्ध पर्शीयन सुफी संतकवी "फरीदुद्दीन अत्तार” यांच्या

“मंती्क-उत-तैर” या आगळ्या वेगळ्या पर्शीयन काव्यग्रंथाचा

सर्वप्रथम "पक्ष्यांची सभा" हा मराठी गद्यानुवाद 2020 प्रकाशित.

• 108 जाहीर कार्यक्रमात माऊलींचे पसायदान सादर करून माऊलींची

सेवा अर्पण!

• पसायदानातील भाव,कबीरचा राम आणि कबीरचा रहीम,अभंग

रसग्रहण,उर्दू गझल अर्थ -रसग्रहण, शायरांचे द्रष्टेपण, सुफिसम,

पक्ष्यांची सभा यावर व्याख्याने.

• फेसबुक वरील स्फू ट लेखांचा त्यांचा ब्लॉग लोकप्रिय.

• 2012-13 मध्ये ईनरव्हील क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्षपद

भूषविले. इनरव्हीलचा Star Personality पुरस्कार, ठाणे वैभव चा

वैभवी पुरस्कार, रिजेन्सी ग्रुपचा विशेष पुरस्कार, कवितांसाठी अनेक

प्रथम पुरस्कार.ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानचा, अभंग-अर्थ विवेचन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त.

Read More...

Achievements

+9 more
View All