Share this book with your friends

VAJIKARAN / वाजीकरण पूर्वार्ध

Author Name: Vd. Shirsath S. I. Vd. Swami S. I., Vd. Swami Santosh Irayya | Format: Paperback | Genre : Educational & Professional | Other Details
आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आहार-विहारा संबंधी योग्य नियम न पाळल्याने, इंद्रियांचे मिथ्यायोग आदींमुळे प्रजोत्पादक अवयव तथा प्रजोत्पादना संबंधी समस्या वाढलेल्या आहेत. त्यात अनेक रूग्ण क्लैब्य, वंध्यत्व, स्वप्नदोष, Premature ejaculation, धातुदोष अशा वेगवेगळ्या समस्या घेवून रूग्णालयात येतात. आधुनिक वैद्यकशास्त्राची, नवनवीन तंत्र विकसीत झाल्याने झपाट्याने प्रगती झाली, त्यात वेगवेगळ्या व्याधींसाठी वेगवेगळ्या शाखा-उपशाखा निर्माण झाल्यात. एवढे असतांना देखील त्यांच्याकडूनही एक अंग दुर्लक्षित झाले, ते म्हणजे ‘वाजीकरण तंत्र’ कारण वरील समस्या असणारे रूग्ण त्यांच्या वेगवेगळ्या शाखांच्या तज्ञांकडून चिकित्सा घेतांना दिसतात. जसे क्लैब्य असणारे रूग्ण ‘मुत्ररोगतज्ञ’ (Urologist), ‘मानसरोगतज्ञ (Psychiatrics)’, तर पुरूष वंध्यत्व असणारे रूग्ण ‘स्त्रीरोगतज्ञ’(Gyanecologist) यांच्या कडून चिकित्सा घेतात. मात्र त्यांच्याकडे वरील सर्व समस्यांच्या निराकरणासाठी सध्या तरी स्वतंत्र शाखा अस्तित्वात नाही. वरील तज्ञांकडून उपचार घेतलेले, परंतु उपशय न मिळाल्यामूळे अनेक रूग्ण चिकित्सा घेण्याकरीता आयुर्वेद रूग्णाल्यात येत असतात. म्हणूनच दुर्लक्षित परंतु आयुर्वेदातील एक महत्वाचे अंग म्हणून ‘वाजीकरणतंत्र’ या अंगाचा अभ्यास करण्याचे ठरविले.
Read More...
Paperback
Paperback 155

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

वै. शिरसाठ एस. आय. वै. स्वामी एस. आय., Vd. Swami Santosh Irayya

वै. सुरज ईश्वर शिरसाठ यांनी आपले बी. ए. एम.एस. (पदवी ) चे शिक्षण २००२ साली नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, जळगाव येथून पूर्ण केले. कायाचिकित्सा या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण २००७ साली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी , नांदेड येथून पूर्ण केले. त्यांनी विविध आयुर्वेदिक कॉलेजमध्ये १० वर्षे असिस्टंट प्रोफेसर व असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केले. मागील ३ वर्षांपासून ते एम ई एस आयुर्वेद महाविद्यालय, खेड, रत्नागिरी, महाराष्ट्र येथे कायाचिकित्सा विषयामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम पहात आहेत.वै. संतोष इरय्या स्वामी यांनी आपले बी. ए. एम.एस. (पदवी ) चे शिक्षण १९९८ साली शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर येथून विशेष श्रेणी मध्ये पूर्ण केले. कायाचिकित्सा या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण २००४ साली शिवाजी युनिव्हर्सिटी , कोल्हापूर येथून पूर्ण केले. त्यांनी एल आर पी आयुर्वेदिक कॉलेज , उरुण- इस्लामपूर, सांगली येथे ८ वर्षे असिस्टंट प्रोफेसर व असोसिएट प्रोफेसर तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम मार्गदर्शक म्हणून काम केले. मागील ७ वर्षांपासून ते एम ई एस आयुर्वेद महाविद्यालय, खेड, रत्नागिरी, महाराष्ट्र येथे कायाचिकित्सा विभागप्रमुख व प्रोफेसर म्हणून काम पहात आहेत.
Read More...

Achievements

+2 more
View All