Share this book with your friends

college / कॉलेज दूसरी आवृत्ती

Author Name: Raghunathdada Patil | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

लिहीत असतांना यातील पात्रं गप्पा मारायची माझ्याशी....

वाचकांना कॉलेजच्या वयात घेऊन जावं.... त्यांनाही यातला कुठला तरी भाग हा आपल्या आयुष्यात घडला आणि त्यांनी काही काळ का होईना पुन्हा 'वयात यावं', पुन्हा पुन्हा त्या आनंदी आठवणीत जगावं हा शुद्ध हेतू तर होताच त्यासोबत तो काळ पुन्हा जगायचा होता मला.... त्या वयातील जाणीवा, स्वत:चं विश्व, सामाजीक घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन..... आपल्याच विश्वात रममान होणं...प्रेमात पडणं.... मित्राचं आयुष्यातील स्थान...सतत 'मी' भोवती फिरणारं मन....चंचलपणा..... निर्व्याज मैत्री.... फुलपाखरासारखं बागडणं.... प्रत्येक क्षण भारून टाकलेला.... थोडा अवखळपणा.... विषमलिंगी आकर्षण .... काय नसतं त्या वयात! 

खरं तर या वयानंच भारून टाकलं होतं मला...ज्योतिर्मयी भोवती पिंगा घालणारं मन.... जिवलग मित्र चप्प्या.... त्याची बेताची परिस्थिती.... त्याचा साजरा केलेला सरप्राईज बर्थडे..... रात्री भर रस्त्यात त्याच्या गल्लीत त्याने मारलेली मिठी....ते दोघांचं रडणं.... योग्याच्या काकांची गळफास घेऊन केलेली आत्महत्या....त्यानंतर हरवलेला योग्या .... शारदाचं पुरू वरील एकतर्फी प्रेम.... 

कॉलेजातील मारामा-या , जातीय द्वेष, राजकारण, परिक्षा, एखाद्या बॅचला दिलेली सेंड ऑफ पार्टी....झूऑलॉजी च्या लॅबमधील आमच्या करामती....माझं गाव.... ग्रामपंचायत निवडणूका...शारदाच्या आईचा मृत्यू....मित्रांची प्रकरणं....चप्प्याचा धिंगाना....तरुणांचे भावाविश्व् उलगडणारी एक हळवी कथा, सर्वांच्या आयुष्यातील एक सुंदर पाडाव, तारुण्य आणि कॉलेज या विषयावरील इबुक च्या पाच हजार पेक्षा जास्त प्रती डाउनलोड झालेली कादंबरी 'कॉलेज' 

Read More...
Paperback
Paperback 180

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

रघुनाथदादा पाटील

अल्पपरिचय

रघुनाथदादा पाटील 
जन्म :  ३ जून १९७३ 
जन्मगाव : औरंगाबाद, महाराष्ट्र.
बी.एस.सी (महाविद्यालयीन शिक्षण) शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद.
नंतर डॉ. बाम विद्यापीठातून एम.बी.ए आणि एम.ए. (एम.सी अँड जे) (पत्रकारितेची पदवी)
मार्च २००९ मध्ये कॉलेज कादंबरी 'कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली’ या नावाने प्रकाशित झाली.
त्यानंतर विविध वृत्तपत्रांतून लेखन. 
२०१३  मध्ये इयत्ता नववी  (मस्ती की पाठशाला)  या कादंबरीचे  लेखन
२०१५ मध्ये चकवा, राजहंस, तत्ववेडा, मालती या कथांसोबत  जानीदुश्मन या कथेवर आधारीत त्याच नावाने एकांकिका लेखन. 
२०१६ पासून शेतकऱ्यांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखन सुरू.
दैनिक सामनाच्या महादुष्काळ या २३ जानेवारी २०१६ च्या वर्धापनदिनानिमीत्त प्रसिद्ध केलेल्या विशेष पुरवणीत शेतमाल विपणन व्यवस्थेवर आणि त्यातील त्रूटींवर प्रकाश टाकणारा लेख प्रसिद्ध!
महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझी सदाफुली आणि आठवण म्हणून लेख प्रसिद्ध. 
दैनिक सकाळ मधून पर्यटन या विषयावर लेख.
नाट्य दिग्दर्शन आणि नाट्य प्रशिक्षणाच्या कार्यशाळांत सहभाग. 
रोटरी युवक महोत्सवात परिक्षक म्हणून सहभाग. 
नाट्य स्पर्धेचे परिक्षण 
पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशन तर्फे कॉलेज या कादंबरीचे प्रकाशन दुसरी आवृत्ती १५-०८-२०१९
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे युवारंग नाट्यस्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थिती. 
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे विभागीय चित्रपट आणि नाट्य कार्यशाळेच्या प्रथम सत्रात नाट्यलेखन यावर तज्ज्ञ  म्हणून मार्गदर्शन केलेले आहे. 
२०१८ मध्ये ज्येष्ठ लेखक द. ता. भोसले. यांच्या ‘अगं अगं म्हशी’ या कथासंग्रहातील ‘ऑफ़ पिरीयड’ या कथेवर आधारीत लघुचित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केलेले.

Read More...

Achievements