Share this book with your friends

Devalay / देवालय

Author Name: Tukaram Ramchandra Satre | Format: Paperback | Genre : Others | Other Details

हा सर्व  कथापाट लिहुन काढण्यामागे कारण ही तसच आहे , कधी-कधी सामान्य असणाऱ्या  अनेक गोष्टी आपण आपल्या  दैनंदिन जीवनात करत असतो ,  पण  पुढे  जाउन त्याच  गोष्टी  आपल्याला  आपल्या  जीवनाच्या सर्वोच्च स्थानी घेवुन जातात. नावलौकिक ,पैसा , प्रसिद्धी सर्वकाही मिळवुन देतात. तर तुम्हा सर्व  वाचकांना विनंती  की  तुम्हीदेखील स्वतःच्या दिनक्रमाला क्षुल्लक  समजत असाल , तुमची एखादी चांगली सवय तुम्हाला अगदीच सर्वसामान्य वाटत असेल तर  मग  असे  समजु  नका,   कारण  तीच सवय  कदाचित येणाऱ्या काळात   यशस्वीतेची सुंगधी फुले जडवलेली  माळ  तुमच्या  गळ्यात  घालणार आहे.  फक्त  रोजचा रियाज , सराव , अभ्यास  चालु ठेवा. कदाचित श्रीपतमहाराजांची ही जीवनकहानी तुम्हाला यामागचा  सर्व  सार  उलगडुन  दाखवेल आणि  म्हणुच  मी  त्यांचा अनुभव  लिहता झालो  , कदाचित तुम्हाला  प्रोहत्सान मिळावे हाच  एकमेव उद्देश.

Read More...
Paperback
Paperback 210

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

तुकाराम रामचंद्र सत्रे

कादंबरीत केलेली वर्णने किंवा प्रसंग लेखकाने कधी प्रत्यक्ष अनुभवले असतील किंवा जवळुन पाहीले असतील,  अस मलाच काय पण ही कादंबरी जो  वाचेल त्यालाही वाटण्याची शक्यता आहे. पण अस असल तरी लेखकाला मी अगदी लहानपणापासुन ओळखतो त्याच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या नाहीत हे  मी ठामपणे सांगु शकतो. पण अस असल तरी लेखकाला उंच ठिकाणी असणाऱ्या आणि गर्दी नसणाऱ्या अशा मंदीरात जाऊन एकांतवासात गेल्यासारखे तासनतास बसायला आवडते , हे  मला नक्की माहीत आहे. काय असेल ते असेल पण त्याची अशी  ही ध्यानधारणा करण्याची पद्धत विलक्षण आहे. कारण कधी-कधी तो अनेक अशा प्रकारच्या दुर-दुर वर असणाऱ्या मंदिरात जातो तासनतास तिथे बसतो , आणि परत कधी  त्याच्या अस लक्षात येत कि आपण देवाला  नमस्कार करायचा विसरुनच गेलो, आणि तसाच घरी परत आलो.  हे  अस त्याच्या बाबतीत अनेक वेळा घडल्याच त्यान मला सांगितल आहे. 

            कादंबरीचा  'शिरपा'  नावाचा  नायक आणि पुढे श्रीपतमहाराज म्हणुन झालेली त्याची वाटचाल लेखकाने अगदी सहज साध्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेली आहे, वाचकांना ती भाषा अगदीच जवळची वाटेल, अनेक अलंकारीक आणि भारी-भरकम समानार्थी शब्द देता आले असते , पण ते जाणुनबुजुन लेखकाने टाळले आहेत हे लगेच जाणवते. आणि  म्हणुनच कि  काय प्रसंग आणि वर्णने अगदी जिवंत भासतात, खेड्यातला एक सामान्य मजुर ते प्रख्यात किर्तनकार असा प्रवास आणि पुढे त्यालाही आजच्या  सामान्य तरुणाप्रमाणे  येणारी प्रेमबाधा यांचा सुंदर मिलाफ आणि तेवढाच उत्कंठावर्धक शेवट  वाचकांचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

Read More...

Achievements